मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 {उद्देश,निवडीचे निकष अटी, पात्रता} - mahadbtinfo.in

Latest

सामान्य नागरिकांना सरकारी योजना,सरकारी job, सरकारीअनुदान,शैक्षणिक माहिती, उद्योग, विविध स्पर्धा परीक्षा,यांची माहिती ह्या साईटवर मिळेल

Wednesday, October 6, 2021

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 {उद्देश,निवडीचे निकष अटी, पात्रता}

 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021

                               Maharashtra Saur Krishi Pump Yojana 2021 | Kusum Solar Pump Yojana 2021 | Maharashtra Solar Pump Yojana 2021 | Solar Water Pump Yojana Subsidy Maharashtra | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 PDF | मुख्यमंत्री सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 | कुसुम योजना 2021 महाराष्ट्र | 
                                                     Saur Krishi Pump Yojana 2021 Form I

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सौर कृषी पंप योजना राबवण्याचे ठरवले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व उत्पन्नाला लागणारा खर्च कमी करावा या उद्देशाने राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना लागू करण्याचे राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. याकरीता राज्यातील शेतकऱ्यांना सुमारे एक लाख कृषी पंप तीन टप्प्यांमध्ये उपलब्ध करून दिले जातील . तसा प्रस्ताव दिनांक 16 ऑक्टोंबर 2018 च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे.



राज्य सरकारने 31 जानेवारी 2019 पूर्वी मुख्यमंत्री सौर पंप योजना लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर केली होती आणि फेब्रुवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यात सौर पंप बसवण्याचे आदेश देण्यात आले होते. राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांना सौर पंप मिळावे यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज नोंदणी करावी लागते. ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी पात्र लाभार्थ्यांना सौर पंपाचे वाटप केले जाते. नवीन सौर पंप बसवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 मुख्य उद्देश:-

महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांना दिवसा सिंचन करता यावे. तसेच राज्य सरकार जे पारंपारिक पद्धतीने कृषिपंप जोडते त्यासाठी लागणारा खर्च कमी व्हावा. यासाठी राज्य सरकार कृषी पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना सबसिडी देते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा खर्च कमी व्हावा म्हणून ही योजना आणली आहे. महाराष्ट्रामध्ये आजही बरेच शेतकरी आपल्या शेतात पारंपारिक पद्धतीने म्हणजे इलेक्ट्रिक पंपाने तसेच डिझेल पंपाने सिंचन शेती करतात. आज इलेक्ट्रिकचे व डिझेलचे भाव वाढल्यामुळे त्यांना लागणाऱ्या उत्पन्नाच्या खर्चामध्ये खूप मोठी वाढ झालेली दिसते. पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या सिंचन पद्धतीमुळे शेतकऱ्याचा खर्च हा खूप होतो. तसेच योग्य वेळी विज न उपलब्ध झाल्याने, त्याच्या उत्पन्नातही घट होते. अशाप्रकारे दोन्ही बाजूने शेतकऱ्याचे नुकसान होताना दिसते ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने कृषी पंप योजना राबवण्याचे ठरवले आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021- अंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना 95% अनुदानावर कृषी पंपाचे वाटप करते. यामध्ये शेतकऱ्यांना फक्त 5% रक्कम भरावी लागते. शेतकऱ्यांची आवश्यकता विचारात घेऊन 3 अश्वशक्ती डीसी व 5 अश्वशक्ति डीसी क्षमतेचे आणि त्याचबरोबर 7.5 अश्वशक्ती डीसी सौर कृषी पंप शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नाचा खर्च कमी करता येईल आणि बाजारातून महागडे किमतीचे पंप खरेदी करायची गरज भासणार नाही.




मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे फायदे:-

1) शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सोय उपलब्ध होईल.

2)राज्य सरकारचा विज निर्मिती वरील अतिरिक्त भार कमी होईल.

3) शेतकऱ्याच्या वेळेची बचत होईल वेळेवर सिंचनाची सोय झाल्यामुळे उत्पन्नातही वाढ होईल.

4) डिझेल पंपाच्या तुने खर्च कमी आहे.

5) दिवसा कृषी पंपांना अखंडित वीजपुरवठा मिळेल.

6) डिझेल पंपाच्या जागी सौर पंप आल्यामुळे प्रदूषण होणार नाही.



सौर ऊर्जा पंप किंमत एकूण खर्च महाराष्ट्र:-

महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना अंतर्गत सर्वसाधारण गटाच्या अर्जदारांकडून पंपाच्या एकूण किमतीच्या १०% टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून 5% टक्के एवढी रक्कम लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने भरावी लागणार आहे. त्यानंतरच सौर पंपाचे पुढील अनुदान मिळणार आहे.  


सर्वसाधारण प्रवर्गासाठी

अश्वशक्ती

लाभार्थी हिस्सा

भरावयाची रक्कम रु/-

 

3 अश्वशक्ती

10%

16560/-

 

5 अश्वशक्ती

5%

24710/-

 

7.5 अश्वशक्ती

5%

33455/-


अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी

अश्वशक्ती

लाभार्थी हिस्सा

भरावयाची रक्कम रु/-

3 अश्वशक्ती

10%

8280/-

 

5 अश्वशक्ती

5%

12355/-

 

7.5 अश्वशक्ती

5%

16728/-











वरील खर्च उदाहरणाने समजून घेऊ या..- समजा 7.5 अश्वशक्ति सौर कृषी पंपाची आधारभूत किंमत जर 334550/- रुपये (GST सह) सर्वसाधारण प्रवर्गासाठी लाभार्थ्यांचा 10% हिस्सा म्हणजे रुपये 33455/-इतकी रक्कम तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 5% म्हणजे 16728/- एवढी रक्कम भरावी लागेल.


मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना चे लाभारती निवडीचे निकष अटी पात्रता:-

  • योजनेचा लाभार्थी होण्यासाठी शेतकऱ्याकडे कायमस्वरूपी जलस्रोत उपलब्ध असला पाहिजे.
  • लाभार्थी शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नसावी.
  • शेतकरी डिझेल पंपाने सिंचन करत असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल.
  • पाच एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्याला तीन अश्वशक्ति समतेचा सौरपंप देण्यात येईल.
  • पाच एकरपेक्षा जास्त शेती जमीन धारक शेतकऱ्याला पाच अश्वशक्ति समतेचा सौरपंप देण्यात येईल.
  • पाच एकर क्षेत्र पेक्षा जास्त शेत जमीन असणाऱ्या लाभार्थ्यांना भौगोलिक परिस्थितीच्या आधारावर व तसेच त्यांचे चिंतनाची मागणी लक्षात घेऊन 7.5 अश्वशक्ति क्षमतेचा सौर कृषी पंप देण्यात येईल.
  • राज्यातील विद्युतीकरण यापासून वंचित असलेले शेतकरी.
  • विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी.
  • महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणी साठी पैसे भरूनही प्रलंबित असणारे शेतकरी.
  • दुर्गम भागातील शेतकरी.
  • महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी यांना या योजनेत प्राधान्य राहील.
  • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे सामुदायिक विहिरी बोरवेल यांच्या शेजारील शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
  • सौर कृषी पंपासाठी सर्वसाधारण गटाच्या व अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांनी आपल्या त्यातील रक्कम भरलेली असल्यास ते पात्र होतील.


सौर पंप योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:-


  • अर्जदाराचे आधार कार्ड.
  • ओळख पत्र.
  • रहिवासी पुरावा.
  • सात बारा किंवा आठ (अ).
  • बँक खात्याचे पुस्तक.
  • मोबाईल नंबर.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • अनुसूचित जाती जमाती गटातील असेल तर कास्ट सर्टिफिकेट.



सौर पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा दाखल करावा:-

  1. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज https://www.mahadiscom.in/solar/ या संकेतस्थळावर जा.
  1. संकेतस्थळावर गेल्यानंतर तुमची भाषा निवडा.
  1. त्यानंतर लाभार्थी सुविधा या पर्यायांमध्ये ऑनलाईन अर्ज हा पर्याय निवडून तुमच्या आवश्यकतेनुसार सौर कृषी पंप निवडावा.
  1. जर तुम्ही प्रलंबित ग्राहक असाल तर तसे निवडून पुढे दिलेल्या सूचनेप्रमाणे ऑनलाइन अर्ज भरावा.
  1. अर्जदाराने अगोदर वीज मिळवण्यासाठी पैसे भरलेले असतील आणि वीज पुरवठा जोडणी अद्यापही झालेली नसेल तर त्यांनी तशी माहीती भरणे आवश्यक आहे.
  1. अर्जदाराने आपल्या जागेचा संपूर्ण तपशील द्यावा.
  1. ज्या ठिकाणी स्वरूप बसवायचा आहे त्या जागेचा पत्ता आणि सोबतच सातबारावरील जी माहिती आहे ती संपूर्ण भरावी.(उदाहरणार्थ- सातबारा क्रमांक, सर्वे क्रमांक, तालुका, गाव, शेतीचा प्रकार, शेत्रफळ, इत्यादी.)
  1. अ-2 मध्ये सौर कृषी पंप बसविण्याच्या जवळच्या जागेचा किंवा महावितरणाच्या जवळच्या ग्राहकाचा क्रमांक देणे आवश्यक आहे.
  1. ब मध्ये अर्जदाराचा आधार कार्ड प्रमाणे रहिवासी पत्ता व ठिकाण भरा.
  1. क मध्ये जलस्रोत निवडा.(उदाहरणार्थ- विहीर, नदी, शेततळे, बोरवेल).
  1. त्यानंतर तुमच्या घरचा महावितरण वीज जोडणी चा ग्राहक क्रमांक टाका.
  1. घोषणापत्र सविस्तर वाचून त्यावर ठीक करा त्यानंतर खाली नमूद केलेली कागदपत्र पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करा.
  1. अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा.
  1. लाभार्थी क्रमांक अर्जाचा मागोवा घेण्यासाठी तो क्रमांक जतन करुन ठेवा.
  1. अर्ज यशस्वीपणे भरल्यानंतर दहा दिवसाच्या आत सर्वेक्षण करण्यासाठी फिल्ड ऑफिस मधून डिमांड नोट काढण्यात येईल जर फॉर्म अर्जामध्ये काही त्रुटी आढळली तर त्यानुसार अर्जदाराला एसएमएस द्वारे कळविले जाईल

पारेषण विरहीत सौर कृषीपंप नविन वीज जोडणी करिता अर्जाची प्रक्रिया.

  1. महावितरणाच्या वेब पोर्टलवर (https://www.mahadiscom.in/solar) ऑनलाइन अर्ज करावा.
    • सध्याच्या कृषीपंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करुन प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इ. तपशील देणे अनिवार्य आहे.
    • नवीन अर्जदार (परंपरागत कृषीपंप नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा केलेला नाही) सर्व फील्ड अनिवार्य आहेत म्हणून तपशील भरणे आवश्यक आहे.
  2. ए - 1 फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावीे सोबत (कागदपत्रांची प्रत अपलोड करावी)
    • 7/12 उतारा प्रत
    • आधार कार्ड
    • कास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी)
  3. अर्जदाराने ए - 1 फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे.
  4. ऑनलाइन ए - 1 फॉर्म प्राप्त झाल्यापासून 10 दिवसांच्या आत, सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल. जर काही विसंगती आढळली तर त्यानुसार अर्जदाराला कळविण्यात येईल.
  5. डिमांड नोट देय झाल्यानंतर लाभार्थी एजन्सीचे नाव सादर करेल / देईल (केवळ 25000 निविदासाठी लागू आहे).
  6. प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.


    तुम्हाला हेही आवडेल      

 

No comments:

Post a Comment