कुसूम सोलर पंप योजना 2023 { NEW UPDATE }.
कुसूम सोलर पंप योजना 2023 मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता होण्यासाठी तसेच विजेमध्ये सबसिडी किंवा कमी खर्चात वीज उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवण्याचे शासनाने ठरवलेले आहे. या योजने संदर्भात आता नवीन अपडेट समोर आलेली आहे. त्याविषयी आपण पाहू ज्या शेतकऱ्यांना कुसूम सोलर योजना अंतर्गत पात्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांच्यासाठीची ही महत्त्वाची अपडेट आहे काहींना सेल्फ सर्वेचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. काहींना पेमेंटची ऑप्शन देण्यात आलेले आहेत, तसेच काहींना वेंडर निवडण्यासाठी चे ऑप्शन यात देण्यात आलेले आहेत. या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतरच त्यांना सौर पंपाचा लाभ घेता येणार आहे.
महत्वाचे:- ज्यांच्याकडे USER NAME PASSWORD आहे आणि ज्यांचा फॉर्म अपूर्ण आहे त्यांनाच UPDATE करता येणार आहे, नवीन फॉर्म भरण्याची सुविधा अजून सुरु नाही.
- स्थानिक पत्त्या विषयी माहिती अपडेट करायची राहिलेली आहे.
- काहींचे बँकेची माहिती भरायची आहे.
- काही शेतकऱ्यांना बँकेचे डिटेल्स भरायची आहे.
- आपल्याकडील पाण्याचे स्त्रोत यापैकी माहिती भरणे राहिली आहे. अशा शेतकऱ्यांना आता ही माहिती अपडेट करता येणार आहे. त्यासाठीची पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तसेच एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आपली माहिती भरलेली आहे आणि ते आता सेल्फ सर्वेक्षण साठी पात्र ठरणार आहेत. त्यांना आता सेल्फ सर्वेक्षण साठी पर्याय उपलब्ध होणार आहे.
माहिती अपडेट कशी करायची ?
- यासाठी सर्वप्रथम आपल्याला कुसूम सोलर या वेबसाईटवर लॉगिन करायचे आहे तशी लिंक मी या पोस्टच्या खाली देणार आहे तुम्ही तेथे क्लिक करून डायरेक्ट ओपन करू शकतात.
- साइटवर आल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचं आहे.
- लॉगिन केल्यानंतर जर तुमचा फॉर्म अपूर्ण असेल तर तुम्हाला तसे दाखवण्यात येईल.
- किंवा जर फॉर्म पूर्ण भरलेला असेल तर तुम्हाला आता सेल्फ सर्वेक्षण करावे लागेल.
तुमचा फॉर्म जर अपूर्ण असेल तर तुम्हाला खालच्या बाजूला Go ahead /Compleat Yours Form असे दिले आहे.
- तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचे पेज ओपन झालेले दिसेल यात तुम्हाला तुम्ही भरलेली माहिती पैकी कुठली माहिती अपूर्ण आहे आणि कुठली माहिती भरलेली आहे हे दिसेल यामध्ये-:
- a) application resident address.
- b)irrigation source information.
- c)crop details.
- d)required pump details bank details.
- e)scan upload document.
असे पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी तुमची अपूर्ण माहिती भरून तुम्हाला सबमिट करायची आहे. सर्व माहिती भरल्यानंतर खाली अटी व शर्ती या मान्य करून सबमिट एप्लीकेशन वर क्लिक करायचे आहे. सर्व माहिती भरून झालेली असली तरीही अजून कोटा मिळाला नसल्यामुळे आपणाला required pump details भरता येणार नाही. ज्यावेळी तुमच्या जिल्ह्यासाठी कोटा उपलब्ध होईल. त्यावेळी ही माहिती भरून आपण सेल्फ व्हेरिफिकेशन साठी पात्र होऊ शकतो. त्यामुळे आतापर्यंत ज्यांचे फॉर्म अपूर्ण होते ज्यांना फॉर्म कम्प्लीट करता येत नव्हते त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म अपडेट करून एप्लीकेशन सबमिट करून ठेवायचे आहे. आजपासून ही माहिती अपडेट होणार आहे त्यामुळे आपण वेळोवेळी लॉगिन करून आपली माहिती चेक करायची आहे
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण,2021 (पात्र यादी) LIST 2021 लिंक
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 {उद्देश,निवडीचे निकष अटी, पात्रता} लिंक.
- प्रधानमंत्री राष्ट्रीय पोषण मिशन योजना 2021.लिंक
- (अर्ज सुरु )महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण योजना 2021. लिंक
- PMAY-(URBAN)online form, प्रधानमंत्री आवास योजना 2021-ऑनलाइन अर्ज
- महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!!! नवीन 11% महागाई भत्ता लागू होणार
- {PMAY-URBAN} प्रधानमंत्री आवास योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा ? जाणून घेऊया सोप्या शब्दात.
- नवीन पंतप्रधान आवास योजना ग्रामीण-२०२१ नवीन लिस्ट कशी पहायची ?

No comments:
Post a Comment