प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण,2021 ۝ (पात्र यादी) LIST 2021 - mahadbtinfo.in

Latest

सामान्य नागरिकांना सरकारी योजना,सरकारी job, सरकारीअनुदान,शैक्षणिक माहिती, उद्योग, विविध स्पर्धा परीक्षा,यांची माहिती ह्या साईटवर मिळेल

Thursday, October 7, 2021

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण,2021 ۝ (पात्र यादी) LIST 2021

 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2021(ग्रामीण)


प्रधानमंत्री आवास योजना I PRADHANMANTRI AAVAS YOJNA I GRAMIN AAVAY YOJNA LIST इंदिरा आवास योजना I घरकुल योजना IPRADHANMANTRI AAVAS YOJNA LIST I

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण :-

भारतातील प्रत्येक व्यक्तीकडे हक्काचं घर असावं या उद्देशाने केंद्र सरकारने बेघरांना घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा केलेली आहे.केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्यात प्रयत्नाने ज्यांचे उत्पन्न गरिबीरेषा च्या खाली आहे अशा लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दिला जातो. देशभरात प्रत्येक परिवारासाठी आवास किंवा घर ही अतिशय मूलभूत गरज आहे. लोकसंख्या वाढीबरोबर काही कुटुंबांना घराची देखील आवश्यकता असते त्यासाठी प्रत्येकाला घर मिळावं हा उद्देश आहे.




प्रधानमंत्री आवास योजनेचा उद्देश:-

गरीब जनतेला अनुसूचित जाती जमाती मधील लोकांना, मजदुरांना घर मिळावं. मातीचे कच्चे घर पक्क्या घरांमध्ये रूपांतरित करावे हा या मागचा उद्देश आहे. सर्वांसाठी घर हा या योजनेचा एक भाग आहे. तसेच गरिबीचे उच्चाटन होण्यासाठी राबवलेल्या योजनांपैकी ही एक योजना आहे.


प्रधानमंत्री आवास योजना सविस्तर स्वरूप:-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे दिनांक 20 नोव्हेंबर 2016 रोजी आग्रा उत्तर प्रदेश येथून सर्वांना पक्की घरे मिळवीत यासाठी पंतप्रधान आवास योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेचे दोन प्रकार आहेत. 

  1. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. 
  2. प्रधानमंत्री आवास योजना शहरी. 

                                                      ही घोषणा केल्यापासून पुढच्या तीन ते चार वर्षात किमान एक कोटी घरकुलांचे बांधकाम करण्यात येईल यातील घरकुले 25 वर्ग मीटर इतक्या क्षेत्रफळाची टिकाऊ व आपत्ती रोधक असतील. या घरकुलात एक स्वयंपाक घर असेल. या व्यतिरिक्त या घरात शौचालयाचे देखील बांधकाम केले जाईल आणि सौचालय यासाठी अतिरिक्त 12 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. या बांधकामाकरिता पूर्वीची जी आर्थिक मदत होती. त्यात वाढ करण्यात आली असून समतल मैदानी भागात 70000 रुपयांची मदत  वाढवून आता 120000/- इतकी करण्यात आली आहे तसेच दुर्गम भागात हीच रक्कम 130000/- इतकी करण्यात आलेली आहे. 



प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्रता:-

  1.  या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्ती हा भारताचा स्थायी नागरिक असावा.
  2. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
  3. अर्जदाराकडे कुठल्याही प्रकारचे घर किंवा जागा नसावी.
  4.  अर्जदाराच्या परिवाराच्या नावावरही घर किंवा कुठलीही प्रॉपर्टी नसावी.
  5. अर्जदार हा कुठल्याही सरकारी निवासस्थान चा लाभ घेणारा नसावा.
  6. अर्जदाराकडे कुठल्याही प्रकारचे वाहन नसावे. (उदाहरणार्थ- टू व्हीलर फोर व्हीलर)
  7. अर्जदार हा इन्कम टॅक्स भरणारे नसावा.

प्रधानमंत्री आवास योजने साठी लागणारी कागदपत्रे:-

  • आधार कार्ड.
  • रहिवासी दाखला.
  • जॉब कार्ड.

गावातील सर्वेक्षण झाल्यानंतर आधार कार्ड चा डाटा एकत्र केला जातो.त्यानंतर ज्याचे नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये येते त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

-प्रधानमंत्री आवास योजनेची लिस्ट पाहण्यासाठी या लिंक वर क्लीक करा.-


Ahmednagar (अहमदनगर)

Nagpur (नागपुर)

Akola (अकोला)

Nanded (नांदेड़)

Amravati (अमरावती)

Nandurbar (नंदुरबार)

Aurangabad (औरंगाबाद)

Nashik (नासिक)

Beed (भंडारा)

Osmanabad (उस्मानाबाद)

Bhandara (बोली)

Palghar (पालघर)

Buldhana (बुलढाणा)

Parbhani (परभानी)

Chandrapur (चंद्रपुर)

Pune (पुणे)

Dhule (धुले)

Raigad (रायगढ़)

Gadchiroli (गढ़चिरौली)

Ratnagiri (रत्नागिरि)

Gondia (गोंदिया)

Sangli (सांगली)

Hingoli (हिंगोली)

Satara (सतारा)

Jalgaon (जलगांव)

Sindhudurg (सिंधुदुर्ग)

Jalna (जलना)

Solapur (सोलापुर)

Kolhapur (कोल्हापुर)

Thane (ठाणे)

Latur (लातूर)

Wardha (वर्धा)

Mumbai City (मुंबई शहर)

Washim (वाशिम)

Mumbai Suburban (मुंबई उपनगरीय)

Yavatmal (यवतमाल)

आपल्या जीह्यावर क्लीक करून तालुका आणि गाव निवडा व यादी पहा.





प्रधानमंत्री आवास योजनेसाठी FAQ:-

1)प्रधानमंत्री आवास योजनेत परिवारातील किती सदस्यांना लाभ घेता येतो ?
उत्तर:- कोणत्याही एका सदस्याला.
2)प्रधानमंत्री आवास योजनेत दुसर्यांदा लाभ मिळतो का ?
उत्तर:-मिळत नाही.
३)प्रधानमंत्री आवास योजनेत दुरुस्ती साठी लाभ मिळतो का?
उत्तर:-दुरुस्ती साठी मिळत नाही.
4)प्रधानमंत्री आवास योजनेत रक्कम खात्यावर जमा होते का ?
उत्तर:-हो, कामाची स्थिती पाहून वेळोवेळी जमा केले जातात.
5)महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये हि योजना आहे ?
उत्तर:-महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्यात.



➤तुम्हाला हेही वाचायला आवडेल   

No comments:

Post a Comment