प्रधानमंत्री आवास योजना 2021 I PMAY-(URBAN)
PMAY Online Form| Pradhan Mantri Awas Yojana Apply Online | प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन अर्ज | PM Awas Yojana Registration 2021
प्रधानमंत्री आवास योजना 2021 अंतर्गत भारत सरकारने ज्यांच्याजवळ घर नाही किंवा जे गरीबी रेषेखाली आहेत. जे मध्यमवर्गीय आहेत अशा सर्वच व्यक्तींचे आपलं स्वतःचं घर असावं आणि ते पक्कं घर असावे असे स्वप्न असते. ते पूर्ण करण्यासाठी म्हणजेच त्यांना घर उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दिनांक 22 जून 2015 रोजी या योजनेचा निर्णय घेटला. वर्ष 2022 पर्यंत प्रत्येक पात्र व्यक्तीला आपल्या हक्काचं घर देण्याचे या योजनेचे लक्ष आहे. या योजनेचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
- प्रधानमंत्री आवास योजना शहरी PMAY-(URBAN)
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण शहरी PMAY-(RURAL)
प्रधानमंत्री आवास योजना शहरी PMAY-(URBAN) सविस्तर माहिती :-
या योजनेअंतर्गत शहरी क्षेत्रातील झोपड्यांमध्ये कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला नवीन घर खरेदी केल्यावर सरकार द्वारे सबसिडी दिली जाते.आपल्याला प्रत्येकाला माहितीच आहे की नवीन घरे खरेदी केल्यानंतर घेतलेल्या गृहकर्जावर त्याच्या व्याजावर 2.67 लाख रुपये एवढी सबसिडी दिली जाते.या योजनेअंतर्गत सन 2022 पर्यंत 1.12 करोड घरांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त शहरी क्षेत्रांचा समावेश केला आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना त्याची पात्रता आणि निकष माहिती असणे गरजेचे आहे. सरकार घर घेण्यासाठी वेगवेगळ्या बॅंकांकडून कर्ज उपलब्ध करून देईल तसेच लाभार्थ्यांच्या व्याजाच्या रकमेतून त्यांना सबसिडी मिळेल. प्रधानमंत्री आवास योजना शहरी नुसार लाभार्थ्यांच्या तीन टक्के ते 6.5 % इतकं व्याजा वर सूट मिळेल तसेच जे उद्योगपती आपल्या जमिनीवर घर बांधतील त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. तसेच यामध्ये राज्य सरकार ची देखील मदत घेतली जाईल.
प्रधानमंत्री आवास योजना नवीन अपडेट :-
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी या योजनेला मजबुती देण्यासाठी आणि कोविळ 19 (covid 19) मधून गरिबांना सावरण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान 3.0 नुसार प्रधानमंत्री आवास योजना शहरी सबसिडी बजेटमध्ये 18000 करोड रुपये वाढवायचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ 30 जून 2021 पर्यंत खरेदी केलेल्या घरांना होईल.प्रधानमंत्री आवास योजनेचे मुख्य उद्देश सन 2022 पर्यंत 4 करोड पक्क्या घरांची निर्मिती करणे, गरीब परिवार तसेच मध्यम वर्गीय लोकांना या योजनेअंतर्गत दहा लाखापर्यंत च्या कर्जावर 20 वर्षा पर्यंतच्या परतफेडी वरील गृह कर्जावर 6.50% टक्के म्हणजेच 2.67 लाख रुपये सबसिडी मिळणार आहे.MIG 1 तसेच ग्रुपच्या व्यक्तींना वीस वर्षापर्यंतच्या कर्जावर 4% तसेच 3% व्याज सबसिडी मिळेल, म्हणजेच एकूण MIG 1 मध्ये 2.35 लाख MIG 2 ग्रुप मध्ये 2.30 लाख रुपयांची सबसिडी दिली जाईल. या अंतर्गत जास्तीत जास्त 60 स्क्वेअर मीटर(60 sqm) कार्पोरेट एवढे बांधकाम असणं गरजेचे आहे.MIG 2 यामध्ये 160 स्क्वेअर मीटर तसेच स्क्वेअर मीटर एरिया घर खरेदीवर ही सबसिडी मिळणार आहे ज्यांचे उत्पन्न 6.5 लाखाच्या आत आहे त्यांना सहा लाख रुपये कर्ज वर सबसिडी मिळेल. ज्यांचे उत्पन्न बारा लाख रुपये आहे अशांना 9 लाख रुपया पर्यंतच्या कर्जावर 4% व्याज सबसिडी मिळेल.तसेच ज्यांचे उत्पन्न 18 लाख रुपये आहे त्यांना12 लाख रुपये कर्जावर 3% सबसिडी मिळेल.
|
Scheme Type |
Eligibility
Household Income ( Rs.) |
Carpet Area-Max
(sqm) |
Interest Subsidy(%) |
|
EWS and LIG |
Upto Rs.6 lakh |
60 sqm |
6.50% |
|
MIG 1 |
Rs. 6 lakh to Rs 12
lakh |
160 sqm |
4.00% |
|
MIG 2 |
Rs. 12 lakh to
Rs.18 lakh |
200 sqm |
3.00% |
प्रधानमंत्री आवास योजने ची पात्रता :-
- या योजनेअंतर्गत अर्जदार हा भारताचा स्थानिक निवासी असला पाहिजे.
- अर्जदाराचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
- अर्जदाराकडे या अगोदर कुठलीही प्रॉपर्टी नसावी.
- अर्जदार किंवा अर्जदाराच्या परिवारातील कुठलाही सदस्याकडे घर किंवा प्रॉपर्टी नसावी.
- अर्जदार हा सरकारी निवास स्थानी राहणारा नसावा.
पंतप्रधान आवास योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड.
- पत्त्याचा पुरावा.
- रहिवासी दाखला. वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
- बँक खाते पुस्तकाची झेरॉक्स.
- पासपोर्ट साईज फोटो.
- मोबाईल नंबर
|
PMAY Important Links: |
|
|
PMAY ग्रामीण और शहरी लिस्ट |
|
|
आधिकारिक वेबसाइट |
|
|
Urban Awas Yojana Form Download |
|
|
PMAY Consent Form PDF |
|
|
PM Awas Yojana Gramin Form & Guidelines PDF |
|
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी FAQ:-
1)प्रधानमंत्री आवास योजनेत परिवारातील किती सदस्यांना लाभ घेता येतो ?
उत्तर:- कोणत्याही एका सदस्याला.
2)प्रधानमंत्री आवास योजनेत दुसर्यांदा लाभ मिळतो का ?
उत्तर:-मिळत नाही.
३)प्रधानमंत्री आवास योजनेत दुरुस्ती साठी लाभ मिळतो का?
उत्तर:-दुरुस्ती साठी मिळत नाही.
4)प्रधानमंत्री आवास योजनेत रक्कम खात्यावर जमा होते का ?
उत्तर:-हो, कामाची स्थिती पाहून वेळोवेळी जमा केले जातात.
5)महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये हि योजना आहे ?
⟾
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण,2021 (पात्र यादी) LIST 2021 लिंक
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 {उद्देश,निवडीचे निकष अटी, पात्रता} लिंक.
- प्रधानमंत्री राष्ट्रीय पोषण मिशन योजना 2021.लिंक
- (अर्ज सुरु )महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण योजना 2021. लिंक
- PMAY-(URBAN)online form, प्रधानमंत्री आवास योजना 2021-ऑनलाइन अर्ज
- महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!!! नवीन 11% महागाई भत्ता लागू होणार
- {PMAY-URBAN} प्रधानमंत्री आवास योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा ? जाणून घेऊया सोप्या शब्दात.
- नवीन पंतप्रधान आवास योजना ग्रामीण-२०२१ नवीन लिस्ट कशी पहायची ?
No comments:
Post a Comment