सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजना ||
माहिती आहे का तुम्हाला देशामध्ये तसेच राज्यामध्ये मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये वेगवेगळे नकारात्मक विचार असतात राज्यांमध्ये बालिका भ्रूणहत्या केल्या जातात. प्रत्येकाला मुलगा हवा या आशेने मुलींकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. त्यामुळे राज्यामधील बालिका भ्रूणहत्या थांबवण्यासाठी, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे यासाठी, बालविवाह रोखण्यासाठी, मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना राबवण्याचे ठरवले आहे.
दिनांक 1 जानेवारी 2014 पासून दारिद्र रेषेखालील कुटुंबातील जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी कुटुंबातील दोन अपत्यं पर्यंत सुकन्या योजना लागू करण्यात आली होती. सदर योजनेचा शासन निर्णय हा दिनांक 13 फेब्रुवारी 2014 रोजी निर्गमित करण्यात आला होता. त्यानुसार योजनेची अंमलबजावणी ही आयुक्त व महिला बाल विकास पुणे यांच्याकडून करण्यात येत होती. दिनांक 1 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री ही योजना लागू करण्यात आली आहे ही योजना दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंबातील जन्माला येणार्या दोन अपत्यं पर्यंत लागू असेल. जन्माला आलेल्या दोघा अपत्यांपैकी दोन्ही मुली असणे आवश्यक आहे. तसेच दारिद्र्यरेषेवरील (APL)कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी ही या योजनेतील काही लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेचा शासन निर्णय दिनांक 26 फेब्रुवारी 2016 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. दिनांक 22 फेब्रुवारी 2017 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार येणाऱ्या अडचणींवर स्पष्टीकरणात्मक भूमिका मांडलेली आहे. माझी कन्या भाग्यश्री ही योजना राबविण्यासाठी रुपये 153 कोटी रुपये इतका खर्च येईल असा प्रस्ताव माननीय मंत्रिमंडळात सादर करण्यात आला होता.मंडळाच्या दिनांक 7/12/2015 बैठकीत योजनेसाठी आवश्यक निधीबाबत माननीय मुख्यमंत्री यांनी निर्णय दिला. तसेच थोड्याफार प्रमाणात सुधारणाही सुचवल्या होत्या. वित्त विभागाने सुचविल्याप्रमाणे माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये बदल करून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून लागू करण्यात आली.
योजनेचा प्रमुख उद्देश-
- महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण व आरोग्य यामध्ये सुधारणा करणे.
- मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे/
- बालिका भ्रूणहत्या थांबवणे.
- मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे.
- बालविवाह रोखणे.
- मुला इतका मुलींचा जन्मदर वाढविणे.
- लिंग निवडीस प्रतिबंध करणे.
- मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे.
- मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे
योजनेच्या निकष-
दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये साडेसात लाख रुपयापर्यंत आहे अशा समाजातील सर्व घटकांसाठी ही योजना लागू राहील.
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण,2021 (पात्र यादी) LIST 2021 लिंक
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 {उद्देश,निवडीचे निकष अटी, पात्रता} लिंक.
- प्रधानमंत्री राष्ट्रीय पोषण मिशन योजना 2021.लिंक
- (अर्ज सुरु )महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण योजना 2021. लिंक
- PMAY-(URBAN)online form, प्रधानमंत्री आवास योजना 2021-ऑनलाइन अर्ज
- महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!!! नवीन 11% महागाई भत्ता लागू होणार
- {PMAY-URBAN} प्रधानमंत्री आवास योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा ? जाणून घेऊया सोप्या शब्दात.
- नवीन पंतप्रधान आवास योजना ग्रामीण-२०२१ नवीन लिस्ट कशी पहायची ?
- सदर योजना बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत राबविण्यात येईल त्यासाठी बँकेसोबत आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे करारनामा करतील. बँकेसोबत मुदत ठेवी ची कार्य पद्धती कशा प्रकारे राबविण्यात येईल याबाबत स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. मातेने पित्याने कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी सादर करणे आवश्यक राहील.
- माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2017 रोजी जन्मलेल्या व त्यानंतरच्या मुलींना अनुज्ञेय राहील.
- माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना 1 ऑगस्ट 2017 पासून लागू करण्यात येत आहे ज्या कुटुंबांना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पूर्वी एक मुलगी आहे व दिनांक 1 ऑगस्ट 2017 नंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास व माता-पित्याने कुटुंबनियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर फक्त दुसर्या मुलीला रुपये 25 हजार इतका योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
- पहिले अपत्य मुलगा असल्यास व दुसरे अपत्य मुलगी झाल्यास किंवा पहिले अपत्य मुलगी असल्यास व दुसरे अपत्य मुलगा झाल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- कुटुंबात पहिले अपत्य मुलगी आहे व दुसरेही अपत्य मुलगी जन्मल्यास तिला हा लाभ देण्यात येईल, मात्र तिसरे अपत्य जन्मल्यास त्याला हा लाभ देय नसेल.
- तिसरे अपत्य झाल्यास पहिल्या एक व दोन अपत्यांचा लाभही बंद करण्यात येतील. तसेच प्रदान करण्यात आलेली रक्कम 911 प्रव्धानानुसार वसुली या लेखाशीर्ष अंतर्गत जमा करण्यात येईल.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- मुदत ठेवीत गुंतवण्यात आलेली मूळ मुद्दल रक्कम व त्यावरील अठराव्या वर्षी असणारे व्याज अनुज्ञेय होण्यासाठी मुलीचे अठरा वर्ष वय पूर्ण असणे गरजेचे आहे व इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे तसेच मुलगी व अविवाहित असणे आवश्यक राहील.
- दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या तर त्या मुली योजनेस पात्र असतील.
- बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना अनुज्ञेय राहील. दत्तक पालकांनी मुलांचे अकाउंट उघडून हा लाभ या अकाउंटला देण्यात येईल. मात्र दत्तक पालकांवर योजनेच्या सर्व अटी शर्ती लागू राहतील.
- सदर योजना आधार सोबत जोडण्यात येईल.
- विहित मुदतीत पूर्वी म्हणजे 18 वर्षे पूर्ण होण्याअगोदर मुलीचा विवाह झाल्यास किंवा दहावी पूर्वी शाळेतून गळती झाल्यास किंवा दहावी नापास झाल्यास या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नसून मुलीच्या नावे बँक खात्यात जमा असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाच्या नावे असणाऱ्या खात्यात वर्ग करण्यात येईल.
- मात्र नैसर्गिक कारणाने मुलीचा मृत्यू झाल्यास मुलीच्या नावे गुंतविण्यात आलेली रक्कम मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर पूर्ण रक्कम मुलीच्या पालकांना देण्यात येईल.
- प्रत्येक लाभार्थी मुलींसाठी स्वतंत्र खाते बँकेत उघडण्यात येईल तसेच मुलीच्या नावे रक्कम बँकेत जमा केल्यानंतर बँकेकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्राची प्रत लाभार्थ्यांना देण्यात येईल व व त्याची छायांकित प्रत शासकीय कार्यालयात जमा ठेवण्यात येईल.
- सदर योजनेसाठी कोणत्याही मध्यस्थ अथवा अन्य प्रशासकीय व्यक्तीचा सहभाग असणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
- वार्षिक उत्पन्न रुपये साडे सात लाख पर्यंत असल्याचे स्थानिक तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतर योजनेचा लाभ देण्यात यावा.
- मुद्दलावर मिळणाऱ्या व्याजाचा दर हा त्या वेळी त्यावेळी बँकेमार्फत लागू असलेल्या दरानुसार अनुज्ञेय राहील.
- एका मुलीच्या जन्मानंतर माता-पित्याने एक वर्षाच्या आत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण नागरी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे त्यानंतर सादर केलेल्या अर्जाचा विचार करता येणार नाही.
- तसेच दोन मुलींनंतर सहा महिन्याच्या आत कुटुंब नियोजन केल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्याची कार्यपद्धती
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या पालकांनी मुलींचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामीण व नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलींच्या जन्माची नोंदणी करावी.त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र अ आणि प्रपत्र ब जे लागू असेल ते सादर करावे.
- अर्जासोबत वरील अटी व शर्तीनुसार नमूद दस्तऐवज सादर करावेत.
- सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विभागीय उप आयुक्त यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असते.
- अंगणवाडी सेविका येणेयांनी संबंधित लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावा किंवा अर्ज भरण्यास मदत करावी आणि सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांच्याकडे सादर करावा.
- अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्य सेविका यांनी सदर अर्जाची व प्रमाणपत्रांची छाननी तपासणी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थांमधील अनाथ बालकांच्या बाबतीतही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना बाल व महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा परिषद यांना एकत्रित यादी मान्यतेसाठी सादर करावी.
- महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा परिषद यांनी योग्य ती छाननी करून यादिस मान्यता देऊन, बँकेला सादर करावे.
- बालगृह, शिशुगृह किंवा महिला व बालविकास विभागांतर्गत इतर निवासी संस्थांमधील अनाथ मुलींबाबत लाभ मिळवण्यासाठी अर्ज सादर करण्याआधी संबंधित बालकल्याण समिती यांचे मुलगी अनाथ असल्याचे प्रमाणपत्र संबंधित संस्थांकडून प्राप्त करून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- संबंधित अधिकारी हे randomly पद्धतीने जास्त संख्या असलेल्या एखाद्या वस्तीची तपासणी करतील व त्यांची खात्री झाल्यानंतर यादीला मान्यता देण्यात येईल.
- त्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत बाल विकास प्रकल्प अधिकारी व महिला बाल विकास अधिकारी जिल्हा परिषद हे पात्र लाभार्थ्यांचे अर्ज बँक ऑफ महाराष्ट्र शाखेकडे लाभार्थ्यांना रुपये पन्नास हजार किंवा रुपये पंचवीस हजार पात्रतेनुसार जी काही रक्कम असेल ती रक्कम मुदत सर्टिफिकेट मिळण्यासाठी सादर करतील व बँकांकडून मिळालेले प्रमाणपत्र हे हे बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत संबंधित लाभार्थ्याला पालकांना उपलब्ध करून देण्यात येईल.
- अर्जदारांनी संपूर्ण तपशिलासह भरून दिलेले अर्ज कागदपत्रासह वर नमूद केलेल्या अधिकाऱ्यांनी मुलीच्या जन्मानंतर एका मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबाच्या बाबतीत एक वर्षाच्या आत व दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबाच्या बाबतीत सहा महिन्याच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचा दाखला जोडून सादर केलेले अर्ज स्वीकारावेत.
- अर्ज संपूर्ण भरलेला नसेल किंवा प्रमाणपत्रांची अपूर्णता असेल तर अर्ज मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत अर्जदार ला तसे लेखी कळवावे.
- अर्जदारांनी अपूर्ण भरलेल्या फॉर किंवा कागदपत्रांसाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येईल मात्र कुठल्याही परिस्थितीत अर्ज दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही.
- प्रधानमंत्री जन धन योजना या योजनेअंतर्गत लाभार्थी मुलगी व तिची आई यांच्या नावे संयुक्त बचत खाते बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयीकृत बँकेत उघडण्यात येईल, त्यामुळे या योजनेअंतर्गत रुपये 1 लाख अपघात विमा व रुपये 5000 ओवरड्राफ्ट व इतर अनुज्ञेय लाभ घेता येईल.
- माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मिळणारा लाभ लाभार्थ्यांच्या प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत बँक खात्यात देण्यात येईल सदर खाते उघडण्यास अंगणवाडी सेविका मुख्य सेविका पर्यवेक्षिका अर्जदारास मदत करतील.
- माझी कन्या भाग्यश्री ही सुधारित योजना लागू केल्यामुळे सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजनेची पुनरावृत्ती होत असल्यामुळे सदर योजना बंद करण्यात येऊन एकच माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू ठेवण्याचे मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे व तशा सूचना निर्गमित केल्या आहेत.
- आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई आणि विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांनी जिल्हा प्रसिद्धी अधिकारी यांच्या मदतीने या योजनेस पुरेशी प्रसिद्धी द्यावी.
- या योजनेखालील तरदूदि संदर्भात प्रश्न अथवा संभ्रम निर्माण झाल्यास त्याबाबत आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत शासनाकडे करतील व कोणतेही वादग्रस्त मुद्दा बाबत शासनाने दिलेला निर्णय अंतिम राहील.
हा शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या दिनांक 18 जुलै 2017 रोजी झालेल्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार तसेच वित्त विभागाच्या सहमतीनेि अनौ.सां.क्र.168/17/व्यय-6,रदनाांक 31/7/2017 मान्य करण्यात आला आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे व त्याचा सांकेतांक 201708011454091030 असा आहे,
योजनेसाठी भरावयाची प्रपत्र किंवा अर्ज पुढील प्रमाणे
सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेचा FAQ -
1)माझी कन्या भाग्यश्री योजना किती अपत्य साठी लागू होईल ?
उत्तर- 2 अपत्य मुली.
2)पहिला मुलगा आणि दुसरी मुळी असेल तर लाभ मिळेल का ?
उत्तर-लाभ मिळणार नाही
3)APL कुटुंबाना योजनेचा लाभ होईल का ?
उत्तर-होईल काही प्रमाणात
4)योजनेसाठी अर्ज कुठे करता येईल
उत्तर-जवळच्या अंगणवाडी सेविके कडे.
5)मुलीचे शिक्षण १० वी च्या आत झाले तर लाभ मिळेल का ?
उत्तर-लाभ मिळणार नाही.
6)1 मुलीवर शस्त्रक्रिया केल्यास किती रक्कम मिळेल?
उत्तर- 50000/ रुपये लाभ मिळेल.
7)बँकेतील मुदत ठेव कधी काढता येईल ?
उत्तर-मुलीच्या वयाच्या 18 व्या वर्षी 10 वी पास असणे व अविवाहित असणेआवश्यक आहे
8)तिसरे अपत्य झाल्यावर काय होईल ?
उत्तर- बँकेत मुदत ठेव ठेवलेली रक्कम सरकारच्या खात्यात वर्ग करण्यात येईल.
⟾ तुम्हाला हेही आवडेल
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण,2021 (पात्र यादी) LIST 2021 लिंक
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 {उद्देश,निवडीचे निकष अटी, पात्रता} लिंक.
- प्रधानमंत्री राष्ट्रीय पोषण मिशन योजना 2021.लिंक
- (अर्ज सुरु )महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण योजना 2021. लिंक
- PMAY-(URBAN)online form, प्रधानमंत्री आवास योजना 2021-ऑनलाइन अर्ज
- महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!!! नवीन 11% महागाई भत्ता लागू होणार
- {PMAY-URBAN} प्रधानमंत्री आवास योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा ? जाणून घेऊया सोप्या शब्दात.
- नवीन पंतप्रधान आवास योजना ग्रामीण-२०२१ नवीन लिस्ट कशी पहायची ?
No comments:
Post a Comment