कांदा अनुदान योजना 2023
कांदा अनुदान योजना 2023 | kanda anudan 2023 | लाल कांदा अनुदान |
नमस्कार मित्रांनो जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. त्यानुसार तुम्हाला काय लाभ होईल तसेच त्यासाठी तुम्हाला शासनाकडून कोणते अनुदान मिळणार आहे व कोणते कागदपत्रे लागणार. त्याची पात्रता काय या सर्व गोष्टी आता आपण पुढे पाहू.
माहित आहे का मित्रांनो आपल्या राज्यातील बहुतेक शेतकरी हे कांदा उत्पादन करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर भत्ता म्हणून कांदा अनुदान देण्याचे शासनाने ठरवले आहे. आपल्याला माहितीच असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 300 रुपये प्रमाणे अनुदान हे अर्थसंकल्पी अधिवेशनात जाहीर केले होते, परंतु शेतकरी या निर्णयावर असंतुष्ट असल्यामुळे शेतकरी संपाच्या तयारीत होते. त्यामुळे या अनुदानात अधिकची 50 रुपयाची वाढ करून शेतकऱ्यांना आता प्रतिक्विंटल 350 रुपयाप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. तसा जीआर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे.
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण,2021 (पात्र यादी) LIST 2021 लिंक
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 {उद्देश,निवडीचे निकष अटी, पात्रता} लिंक.
- प्रधानमंत्री राष्ट्रीय पोषण मिशन योजना 2021.लिंक
- (अर्ज सुरु )महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण योजना 2021. लिंक
- PMAY-(URBAN)online form, प्रधानमंत्री आवास योजना 2021-ऑनलाइन अर्ज
- महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!!! नवीन 11% महागाई भत्ता लागू होणार
- {PMAY-URBAN} प्रधानमंत्री आवास योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा ? जाणून घेऊया सोप्या शब्दात.
- नवीन पंतप्रधान आवास योजना ग्रामीण-२०२१ नवीन लिस्ट कशी पहायची ?
कांदा अनुदानासाठी पात्र लाभार्थी
दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते मार्च 2023 या दोन महिन्याच्या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकलेला असेल, त्याच शेतकऱ्यांना या कांदा अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच हे अनुदान लाल कांद्यासाठीच लागू आहे.
1) कांदा अनुदान योजनेअंतर्गत प्रथम लाभार्थ्याला ज्या बाजार समितीकडे तुम्ही कांदा विकला असेल, त्या बाजार समितीकडे जायचे आहे.
2) बाजार समिती मधून फॉर्म घेऊन भरायचा आहे आणि त्यासोबत काही कागदपत्रे जोडायची आहेत ती पुढील प्रमाणे..
a) कांदा विक्री पावती b) सातबारा उतारा c)बँक खाते पासबुक
3) फॉर्म भरताना काही सूचनांचे पालन करायचे आहे. फॉर्म अचूक भरायचा आहे तरच तुमच्या खात्यात पैसे वर्ग होतील. अन्यथा तुम्हाला कांदा अनुदान भेटणार नाही.
योजनेच्या अटी व शर्ती
1) कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रति क्विंटल 350 रुपये याप्रमाणे मिळणार आहेत. 2) परंतु शेतकऱ्याला जास्तीत जास्त 200 क्विंटल पर्यंतच अनुदान देण्यात येईल.
3) जे शेतकरी लेट खरीप हंगामातील लाल कांदा हा संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार समितीमध्ये, थेट पणन, नाफेड कडून लेट खरीप कांदा खरेदी उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर कांदा विक्री करतील त्यांनाही ही योजना लागू राहील.
4) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई वगळता राज्यातील सर्व बाजार समिती योजना लागू आहे.
5) कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्री पट्टी विक्री पावती सातबारा उतारा तसेच स्वतःचे बँक बचत खाते इत्यादी बाजार समितीकडे जमा करायचे आहेत.
6) ज्या प्रकरणात 7/12 उतारा वडिलांचे नावाने असेल विक्री पट्टी मुलाच्या नावाने किंवा अन्य कुटुंबाच्या नावाने असेल व 7/12 वर पीक पाहणीची नोंद असेल अशा प्रकरणात सातबारा उतारा ज्यांच्या नावे आहे त्यांच्याच बँक खात्यात अनुदान जमा केले जाईल.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे व त्याचा संकेतांक 202303271314318602 आहे.
"शासन निर्णय साठी येथे CLICK करा"
No comments:
Post a Comment